आरजी ज्वेलर्सची दोन तास चौकशी 3.5 किलो चांदी केली जप्त
प्रतिनिधी/ सातारा
केरळमधील रॅबरी चोरी प्रकरणी शनिवारी सायंकाळी केरळ पोलीस पुन्हा साताऱयात दाखल झाले. त्यांनी आरजी ज्वेलर्स च्या मालकांची 2 तास चौकशी केली. आणि 3.5 किलो चांदी जप्त केल्याचे समजते.
केरळ मध्ये झालेल्या रॅबरी चोरीचे धागेदोरे साताऱयात सापडत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी केरळ पोलीसांनी साताऱयात 15 दिवस तळ ठोकला होता. या प्रकरणात अनेक नामवंत व्यवसायिकांची नावे पुढे येणार असा अंदाज होता. परंतु काही माहिती न देताच केरळ पोलीस परत गेले. यामुळे तपासावर प्रश्न चिन्ह उभे होते. पुन्हा केरळ पोलीस कधी येणार याकडे लक्ष लागले असताना शनिवारी सायंकाळी केरळ पोलीस साताऱयात दाखल झाले. केरळ पोलीस साताऱयात कधी आले यांची ठोस माहिती सातारा पोलीसांनाही नव्हती. केरळ पोलीसांनी मोती चौकातील आरजी ज्वेलर्सचे मालक राजेंद्र घाडगे यांची भेट घेतली. या प्रकरणी घाडगे यांची दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीत त्यांना काही संशयास्पद आढळले. ही संपूर्ण माहिती तसेच 3.5 किलो चांदी जप्त केल्याचे समजते.









