ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
शारजाहून कॅलिकटला जणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरवण्यात आले. उड्डाणादरम्यान या विमानात काही गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. पायलटने वेळीच सतर्कता दाखवत हे विमान तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील धोका टळला आणि विमानातून प्रवास करणारे 104 प्रवाशी थोडक्यात बचावले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली.
Previous Articleस्टारविन्स आर्ट फेस्टिवल रविवारपासून
Next Article कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी विरोधी









