ऑनलाईन टीम / तिरुवनंतपुरम :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामध्ये सामान्य जनतेसह कलाकार, राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच, धक्कादायक बाब म्हणजे आता केरळचे कृषी मंत्री वीएस सुनील कुमार यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
कृषिमंत्री कुमार यांना यापूर्वी मागील वर्षी 23 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. खर तर मागच्या वेळी त्यांनी या महामारीवर मात केली होती. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कोझीकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 8,778 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे सद्य स्थितीत 58,245 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.









