ऑनलाईन टीम / तिरुची :
केरळमध्ये गर्भवती हत्तींनीला स्फोटके खायला घालून तिची हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच तिरुची येथील जीयापुरमजवळ कोल्ह्याला मांसाच्या आत देशी बनावटीचे बॉम्ब ठेवून खायला घालण्यात आले. कोल्ह्याने हे मांस खाताच बॉम्ब त्याच्या तोंडात फुटून कोल्ह्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी वनविभागाने नरिकुरवार जमातीच्या 12 लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे दोन बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नरिकुरवार जमातीच्या 12 लोकांचा एक गट जीयापुरमजवळ मधाच्या शोधात गेला होता. हा गट पुन्हा गावात माघारी येत असताना त्यांना कोल्हा आढळला. त्यांनी कोल्ह्याची शिकार करण्याच्या हेतूने त्याला मांसातून देशी बनावटीचे बॉम्ब खायला घातले. बॉम्ब कोल्ह्याच्या तोंडात फुटल्याने कोल्ह्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एका संशयित गटाची चौकशी केली. तेव्हा मृत कोल्ह्यासह 12 जणांना ताब्यात घेण्यात आले.