बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) प्रथम विभाग सहाय्यक परीक्षा पेपर लीक प्रकरणाची चौकशी करणार्या केंद्रीय गुन्हे शाखेने गुरुवारी आणखी एकाला अटक केली. एकूण अटक केलेल्यांची संख्या २० च्या वर गेली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटक केलेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे व्यंकटेश असे या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान तो आधीपासून पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा भाऊ आहे.
पेपरची लीकची घटना २२ जानेवारी रोजी परीक्षेच्या आदल्या दिवशी उघडकीस आली आणि त्यानंतर केपीएससीने परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित केली.