विदेश मंत्री जयशंकर दौऱयावर
वृत्तसंस्था/ नैरोबी
भारतीय विदेशमंत्री एस. जयशंकर केनियाच्या तीन दिवसांच्या दौऱयावर आहेत. मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेत दोन्ही देशांदरम्यान एका व्यापक भागीदारीवर चर्चा करण्यात आली आहे. यापूर्वी विदेश मंत्र्यांनी केनियातील भारतीय समुदायासोबत ऑनलाईन संवाद साधला आहे.
केनियाच्या विदेश मंत्र्यांसोबत भारत-केनिया संयुक्त आयोगाच्या तिसऱया बैठकीत जयशंकर सामील होणार आहेत. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात येणार आहे. संयुक्त आयोगाची मागील बैठक मार्च 2019 मध्ये नवी दिल्ली येथे पार पडली होती. केनियात भारतीय वंशाच्या सुमारे 80 हजार लोकांचे वास्तव्य आहे. यातील सुमारे 20 हजार जण भारतीय नागरिक आहेत.
विदेशमंत्री जयशंकर आणि केनियाच्या विदेश मंत्री रशैला ओमामो यांनी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली आहे. दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करण्याचे काम संयुक्त आयोग करणार आहे.









