चिपळूण
तालुक्यातील केतकी खाडीत तरुणाचा मृतदेह 29 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आढळला आहे. मिलिंद भिवा सैतवडेकर (32, केतकी-भोईवाडी, चिपळूण) या मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबतची खबर महेंद्र भिवा सैतवडेकर (केतकी-भोईवाडी, चिपळूण) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद हा आपली बहीण वैष्णवी कासेकर हिला धामणदेवी-भोईवाडी येथे कोंबडीचे खाद्य देण्याकरिता गेला होता. तो केतकी ते धामणदेवी असा खाडीतून होडीने येत असताना मोठय़ाने ओरडण्याचा आवाज आल्याने कासेकर यांनी मागे फिरुन पाहिले असता मिलिंद हा होडीमध्ये दिसला नाही. त्याचा शोध घेतला असता तो कोठेही आढळला नाही.
याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात मिलिंद हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर 29 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास केतकी स्मशानभूमीच्या खालच्या बाजूस बंदराच्या पाण्यात मिलिंद याचा मृतदेह आढळून आला.








