क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
धारवाड विभागिय क्रिकेट संघटना व बेळगाव जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केएससीए 16 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट निवड चाचणी 20 ऑक्टोबर रोजी ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
सदर निवड चाचणीत 1 सप्टेंबर 2005 नंतर जन्मलेल्या क्रिकेटपटुंनी या निवड चाचणीत भाग घेऊ शकतात. तरी इच्छुक क्रिकेटपटूंनी आपल्या किटसह दहावीचे मार्क्स कार्ड, जन्म दाखला किंवा आधार कार्ड आणणे सक्तीचे आहे. अधिक माहितीसाठी केएससीए मॅनेजर महावीर बद्दण्णावर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केएससीए धारवाड झोनचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी केले आहे.









