बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळने (केएसआरटीसी) बुधवारी पुदुचेरीमधील ठिकाणांसाठी आंतरराज्यीय बस सेवा २३ ऑक्टोबरपासून (शुक्रवार) पुन्हा सुरू होईल असे जाहीर केले आहे.
केएसआरटीसी अधिकाऱ्यांनी कोरोना-लॉकडाऊन दरम्यान टप्प्याटप्प्याने उठविण्यात येणारी बंदी आणि जनतेच्या वाढत्या मागणीच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. दरम्यान प्रवास करताना सर्व प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. प्रवासी www.ksrtc.in वर किंवा केएसआरटीसी / फ्रेंचायझी अॅडव्हान्स रिझर्वेशन काउंटरद्वारे आगाऊ ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात असे म्हंटले आहे.









