बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. अनलॉक ३.० मध्ये अनेक व्यवहार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी काही नियमावलीही तयार करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांचा विचार करून राज्य सरकारने बस सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. दरम्यान, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) सोमवारपासून कर्नाटकहून केरळला आंतरराज्यीय बसगाड्या सुरू करेल. १२ जुलैपासून मंगळूर पुत्तूर, बेंगळूर, म्हैसूर आणि इतर ठिकाणांहून बस सेवा सुरू होईल.
केएसआरटीसीच्या माहितीनुसार, केरळ ते कर्नाटकला जाणाऱ्यांनी अनिवार्यपणे कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच तो अहवाल ७२ तासापेक्षा जुना नसावा. तसेच लसीचा किमान एक डोस घेतलेला असावा.
दरम्यान, विद्यार्थी आणि कर्नाटकला जाणार्या इतर नियमित प्रवाश्यांनी पंधरवड्यात एकदा आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी आणि कोरोना नकारात्मक प्रमाणपत्रे घ्यावीत.









