प्रतिनिधी / बेळगाव
पिरनवाडी येथील केएलएस पब्लिक स्कूलमध्ये 2019-20 चा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन प्रशांत कुलकर्णी होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सीबीएसईद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच पहिली ते नववी वर्गातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना स्मृतिचिन्ह, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पेरणा दिली. शाळेच्या प्राचार्या शालिनी संक्रोनी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.









