विजेत्यांना दिली दिव्यांगांनी बनविलेली बक्षिसे
बेळगाव : केएलई स्वशक्ती महिला सक्षमीकरण कक्षातर्फे दीपोत्सवअंतर्गत केएलईच्या शिक्षक व शिक्षकेतर महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी, मास्क पेंटिंग, दागिने व हार तयार करणे तसेच पाककला स्पर्धा घेण्यात आली. सदर कक्ष ‘व्होकल फॉर लोकल’ या सूत्रावर भर देत असून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न म्हणून या स्पर्धा घेण्यात आल्या. स्थानिक विपेते, व्यापारी यांना प्राधान्य देत विजेत्यांना देण्यात आलेली बक्षिसे ही दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तुंच्या रुपातच देण्यात आली. पक्षाच्या अध्यक्षा आशा कोरे, सचिव प्रिती कोरे-दोदवाड यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.









