प्रतिनिधी / बेळगाव :
केएलई स्वशक्ती फौंडेशन आणि गृहरक्षक दल बेळगाव यांच्यावतीने गरजु महिला आणि स्थलांतरीत कामगार यांना 100 हून अधिक अन्नधान्यांचे कीट वितरित करण्यात आले. सदर कीट स्वशक्ती फौंडेशनच्या संचालिका डॉ. प्रिती कोरे यांनी पुरस्कृत केले होते. गृहरक्षक दलाचे कमांडन्ट डॉ. किरण नायक यांच्या पुढाकाराने सदर कीट वितरित करण्यात आले.
या कीटचे पॅकेजिंग गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी केले. सामाजिक अंतर पाळून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करुन सदर कीट वितरित करण्यात आले. यासाठी गौरी गजबर तसेच सोनाली, वर्षा, आकांक्षा, निखिल आणि गृहरक्षक दलाचे स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.









