पाचशेहून अधिक वैद्यकीय स्पर्धकांचा सहभाग
प्रतिनिधी /बेळगाव
वैद्यकीय अभ्यास व सराव सांभाळत खेळाकडेही लक्ष देवून स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे आहे. तरच शारिरिकदृष्टय़ा आपण तंदरूस्त बनू शकतो. खेळामुळे आपल्या जीवनातील मार्ग बदलू शकतात. त्यासाठी आपण जोमाने सराव केला पाहिजे, असे प्रतिपादन बेळगाव विभागीय वन खात्याचे उपायुक्त हरिषबानू जी. पी. यांनी केले.
केएलई अकॅडमिक ऑफ हायर एज्युकेशन आणि रिसर्च ऍथलेटीक्स स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. केएलई महाविद्यालयाचे रजिस्टर डॉ. क्ही. ए. कोठीवाले, बी. एम. कंकणवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहासकुमार शेट्टी, जे. एन. एम. सी महाविद्यालयाचे प्राचार्य एन. एस. महांतशेट्टी, केएलई डेंटल महाविद्यालयाचे प्राचार्य अलका काळे, केएलई नर्सिंगच्या प्राचार्या सुधा रेड्डी, केएलई फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य संजीवकुमार, केएलई होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद उडचणकर, केएलई स्टुडंट वेल्फेअरचे सभासद डॉ. रणजित कांगले, केएलई महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक रविंद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत पाहुण्यांकडे सुपूर्द केली. यावेळी पाहुण्यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले. 500 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.









