प्रतिनिधी /बेळगाव
केएलईएस डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीमध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. कटगेरी म्हणाले, प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी विवेकानंद यांच्या जीवनातून सकारात्मकतेचा विचार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. डॉ. एस. एफ. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.









