पंढरपूर / वार्ताहर
उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथील तरुणींवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर घृणास्पद अत्याचार करण्यात आला आहे. यात पीडित तरुणींचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आहे. त्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत असून राष्ट्रवादी युवती काँग्रेस, सोलापूरच्या वतीने व प्रदेशअध्यक्षा साक्षणा सलगर यांच्या सूचनेनुसार पोस्टरला बांगड्यांचे हार घालून आंदोलन करीत निषेध करण्यात आला. तसेच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना बांगड्या पोस्टाने भेट देण्यात आल्या.
यावेळी श्रीया भोसले (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस), किर्ती मोरे (युवती पंढरपूर तालुका अध्यक्ष), चारुशीला कुलकर्णी (प्रदेश संघटक,) डॉ. अमृता मेनकुदळे (पंढरपूर शहर अध्यक्ष), सुधीर भोसले (पंढरपूर शहर अध्यक्ष), साधना राऊत (ओ.बी.सी. महिला जिल्हाअध्यक्ष), अनिता पवार (पंढरपूर महिला तालुका अध्यक्ष), संगीता माने (पंढरपूर शहर अध्यक्ष), सचिन कदम(पंढरपूर शहर उपाध्यक्ष), कपिल कदम ( पंढरपूर शहर सहसचिव),शुभम साळुंखे (उपाध्यक्ष,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस) ओंकार जगताप (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस), सारिका गायकवाड, हर्षाली परचंडराव, गायत्री सावंत, राधा मलपे, योगिता मस्के, शीतल शिरगिरे, भक्ती शिंगटे, ऐश्वर्या शिंगटे आदी उपस्थित होते.
Previous Articleआनंदनगर-वडगाव येथील दोघे जण बेपत्ता
Next Article वारणा पात्रात मगरींचा वावर वाढला









