जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांविरोधात जे कायदे केले आहेत ते शेतकरी आणि कामगारांना मारक आहेत. तेंव्हा तातडीने ते कायदे रद्द करावे, या मागणीसाठी सिटूतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.
भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र या देशातच शेतकऱयांच्या विरोधात कायदे केले जात आहेत. ते कायदे जाचक आहेत. त्या कायद्यांमुळे शेतकऱयाला मजूर म्हणून काम करावे लागणार आहे. तेंव्हा तातडीने ते कायदे रद्द करावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
कामगारांविरोधातही काही जाचक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारवर्ग हाताश झाला आहे. अशाप्रकारे केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. तो अत्यंत देशाच्या हितदृष्टीने धोकादायक असून हे कायदे रद्द करावेत. याचबरोबर शेतकऱयांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सीटूने हा मोर्चा काढला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी मंदा नेवगी, कृष्णाताई शिवाण्णाचे, जी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या..









