देवी-देवता अन् महापुरुषांवर असणार आधारित
विदेशी ऑनलाईन गेम्सचे व्यसन सोडविण्याची मोहीम
देशात पब्जीवर बंदी घातली गेली असली तरीही भारतात खेळल्या जाणाऱया ऑनलाईन गेम्सपैकी 98 टक्के विदेशी आहेत. टेम्पल रन आणि सब-वे सर्फरपासून अँग्री बर्डस यासारख्या गेम्सचा कंटेट, पात्र आणि मूल्य विदेशी आहे. केंद्र सरकार आता ही स्थिती बदलण्याच्या तयारीत आहे. प्रयत्न यशस्वी ठरल्यास दुर्गामाता आणि कालीमातेसह छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी तसेच अन्य देवी-देवता आणि महापुरुषांवर आधारित गेम्स मुलांना भारतीय मुलांसह गेमिंगचा आनंद मिळवून देतील.
ऑनलाईन गेम्सद्वारे विदेशी मानसिकतेत गुंतण्यापासून मुलांना रोखणे, स्वदेशी तसेच संस्कारी गेम विकसित करण्यासाठी डॉ. पराग मनकीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन समितीने ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्ससाठी नॅशनल सेंटर फॉर एक्सिलेंस सुरू करण्याचा ब्ल्यूप्रिंट सरकारला दिला आहे. मुंबईत हे केंद्र स्थापन होणार आहे.
हिंसा अन् शस्त्रास्त्रांचा गेम्समध्ये भडिमार
वेगाने वाढत चाललेल्या या बाजारपेठेत भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा उद्देश आहे. विदेशी गुंतवणूकदार हिंसाचार आणि शस्त्रास्त्रांच्या गेम्सवर लक्ष केंद्रीत करतात. या गेम्सची उलाढाल 14.6 लाख कोटींची आहे. पण शिक्षण, पर्यटन, व्यवसाय आणि व्यवस्थापन सैन्य कौशल्याच्या गेम्सचा कल वाढत आहे. यांचा बाजारही 50 अब्ज डॉलर्सच्या पार पोहोचला आहे. भारतात कथेचा समृद्ध वारसा असूनही विदेशी कंपन्या आमच्या तरुणाईच्या कौशल्याचा लाभ उचलत असल्याचे मनकीकर म्हणाले.









