प्रतिनिधी / बेळगाव
अखिल भारतीय ग्रामीण नोकर संघाच्यावतीने मंगळवारी मुख्य पोस्ट कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. कोरोना काळातही घरोघरी जाऊन सेवा देणाऱया पोस्ट कर्मचाऱयांच्या पगारामध्ये कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर टीए व डीए आणि बोनसदेखील देण्यात येणार नसल्याने पोस्ट कर्मचाऱयांची आर्थिक परिस्थिती खालावली जाणार आहे. या विरोधात मंगळवारी मुख्य पोस्ट कार्यालयात निदर्शने करण्यात
आली.
पोस्ट कर्मचाऱयांवर नवनवीन टार्गेट देण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या सर्व योजना ग्रामीण भागात राबविण्याचे मुख्य काम पोस्ट कर्मचारी करत आहेत. परंतु कोरोनामुळे अर्थव्यवस्था बिघडल्याचे सांगून कर्मचाऱयांची वेतन कपात केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी संघटनेचे विभागप्रमुख दुंडाप्पा माविनकट्टी, खजिनदार बसप्पा करिकट्टी, गंगाधर हुद्दार, शिवाप्पा बरगण्णावर, रुक्मिणी बडिगेर, अनिल बडिगेर यासह इतर कर्मचारी उपस्थित
होते..









