पन्हाळ्यात किसान आत्मनिर्भर यात्रा संपन्न
प्रतिनिधी / पन्हाळा
शेतकऱ्यांच्या हितासाठी असणारी विविध कृषी विधेयके केंद्र शासनाने मंजुर करुन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दलालांपासुन मुक्त केले आहे. नवीन शेतीविषयक कायदा अंमलात आणल्यास शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे. पण कायदाच रद्द करा ही मागणी आत्मघातकी आणि काळाचे चक्र उलटे फिरवणारी आहे. शेतकऱ्यांनी अपप्रचाराला बळी पडुन अफवावर विश्वास न ठेवता आपल्या हिताचे हे नवे कायदे समजावुन घेतले पाहिजे असे मत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ पन्हाळा येथे रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसाम मोर्चा यांच्यासंयुक्त विद्यामाने आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेत बोलत होते.
खोत पुढे म्हणाले की, 14 वर्षापुर्वी तुम्ही राज्यात आणलेले कायदे आज देशपातळीवर आल्यावर तुमच्या पोटात दुखु लागले असुन तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या बाजुने की विरोधी हे जाहीरपणे सांगुन केवळ श्रेय मिळत आहे,या उद्देशाने शेतकरी विरोधी भुमिका घेऊन सर्व विरोधक एक झाले आहेत. ही आत्मनिर्भर यात्रा राज्यात आणि देशात शेतकरी वर्गात नवीन क्रांती घडवुन आणणार आहे.
यावेळी आ. गोपीचंद पडळकर यांनी केंद्र सरकारने कृषी कायदे आणल्यामुळे दलालांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे. शेतकऱ्यांच्यात अफवा पसरवुन लुटारु टोळी केंद्र सरकारने मंजुर केलेले कायदे मोडीत काढण्यासाठी केवळ केंद्रसरकराला विरोध म्हणुनच प्रयत्न करत आहेत. कृषी विधेयकांचे निश्चित शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.या नव्या कायद्यानुसार शेतकऱ्याना त्याचा हक्काचा शेतीमाल कोठेही विकता येणार असल्याचे म्हणाले.
पन्हाळ्यातील छ.शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे दर्शन घेवुन आजच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशाची सुरुवात करण्यात आली.यावेळी कृषी विधेयकांच्या समर्थानात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रयक क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, एन. डी. चौगुले, भाजपा पन्हाळा शहराध्यक्ष अमरसिंह भोसले, नगराध्यक्षा रुपाली धडेल, भाजपा महिला जिल्हाउपाध्यक्ष माधवी भोसले, सचिन शिपुगडे, अनुप गवंडी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात शेतकऱ्यांची दलालापासुन मुक्तता करावी असे लिहिले आहे.पण सध्या त्यांनी दर्शवलेला विरोधामुळे शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नव्हते. तर त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असे आत्मचरित्रात लिहिले जाईल. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली.
दरम्यान यावेळी नियमित कर्जदारांना प्रोत्साहानपर अनुदान अद्याप मिळाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारला कोरोना झाला आहे.त्यामुळे ते जनतेपासुन अलगीकरण झाले आहे. त्यांनी नियमित कर्जदारांची फसवणुक केली असुन 50 हजाराचे प्रात्सोहनपर अनुदान तातडीने द्यावे, अन्यथा तीव्र आदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला.









