सातारा / प्रतिनिधी :
वीज बिल विधेयक 2021 रद्द झालेच पाहिजे, या मागणीसाठी वर्कर्स फेडरेशन, सबाॅर्डीनेट इंजिनिअर असोशिएशन इंटक या तिन्ही सघटनेच्या वतीने महावितरण सातारा सर्कल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी नानासाहेब सोनवलकर, अविनाश खुस्पे साहेब, प्रशांत वाघ यानी मनोगत व्यक्त केले आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. वीजकामगार, अधिकारी, अभियंता संयुक्त कृती समितीचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.









