नविन शैक्षणिक धोरणामुळे गोरगरीब विद्यार्थीं शिक्षणापासून वंचित राहणार
प्रतिनिधी / शाहूवाडी
केंद्र सरकारने संसदेत चर्चा न करता, मागील दोन वर्षे जनतेने केलेल्या सुचनांच पालन न करता, राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात, संविधानिक मूल्याच्या विरोधातील नविन शैक्षणिक धोरण लोकांच्या माथी मारण्याचा कुटील डाव मोदी सरकारने आखला आहे. शिक्षणाचे, केंद्रीकरण, व्यापारीकरण, धार्मिकीकरण, करण्याचा प्रयत्न सरकारचा प्रयत्न आहे. शिक्षकांची भूमिका कमी करत, एनजीओंचा हस्तक्षेप वाढवला जाणार आहे. पक्षपाती प्रसारमाध्यमांना हाताशी धरून हे धोरण कसे चांगले आहे. हे लोकांच्यात बिंबवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
या शैक्षणिक धोरणामुळे गोरगरीब, कष्टकरी, विद्यार्थीना उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, यांच्या विचारधारेवर काम चालणाऱ्या जणतेचा या नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध आहे. याचा निषेध म्हणून आज आम्ही शाहूवाडीतील मलकापूर या ठिकाणी या मनुवादी शैक्षणिक धोरणाची होळी करण्यात आली. या वेळी बोलताना भाई भरत पाटील म्हणाले,”या धोरणामुळे जुन्या कालबाह्य झालेली संस्कृती पुन्हा रूजवल्यामुळे पुन्हा अस्पृश्यता निर्माण होऊ शकते. भांडवलदारंना कामगार निर्माण होण्यासाठी मदत या धोरणामुळे होणार आहे.
कॉम्रेड हरिष कांबळे म्हणाले’ करोनाच्या आडून भाजप सरकार नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याचा प्रयत्न करत आहे. संविधानाची पायमल्ली करणार हे धोरण संपूर्ण पणे शोषित, कष्टकरी, जणतेच्या विरोधातील आहे. प्रा. प्रकाश नाईक म्हणाले,”या धोरणातील तरतुदी मिळे ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या भवितव्य धोक्यात आले आहे, ज्या ठिकाणी मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत त्याठिकाणी ची मुले स्कुल कॉम्लेक्स मध्ये कशी पोहचतील या वेळी शाहूवाडी तालुक्यातील राजेंद्र माने,प्रा.अभिजीत शेवडे, दस्तगीर अत्तार, प्रविण कांबळे ,नामदेव पाटील, हनमंत कवळे,प्रदिप कांबळे, अनिल कांबळे, गोपळ पाटील, सुदाम कांबळे, इत्यादी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









