ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना विषाणू अक्षरशः थैमान घालत आहे. कोरोनाचा प्रदुभाव रोखण्यासाठी देशात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी देखील रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांना देखील आता कोरोनाची लागण झाली आहे. बुुुधवारी त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मी आपल्याला सांगू इच्छितो की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनी सतर्क राहावे आणि स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. पुढे ते म्हणाले, शिक्षण मंत्रालयाचे काम सामान्य रुपात चालू राहील.









