प्रतिनिधी/ कराड
केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी शनिवार 25 रोजी कराड दौऱयावर येत असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.
सातारा ते कागल या महत्वपूर्ण रस्त्याचे भूमिपूजन करण्यासह राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जिल्हय़ात व अन्य जिल्हय़ांत सुरू असलेल्या विविध रस्ते सुधारणा कामांची कोनशिला होणार आहे. याशिवाय काही संस्थांच्या कार्यक्रमास ते हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमांची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमांना सातारा जिल्हय़ातील खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, अन्य लोकप्रतिनिधी राज्यातील मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. नितीन गडकरींच्या या दौऱयामुळे जिल्हा भाजपमध्येही उत्साह असून जोरदार तयारी सुरू आहे.









