प्रतिनिधी / सावंतवाडी
डेगवे गावचा सुपुत्र कोविड वॉरियर दिलीप देसाई यांच्या कामाची दखल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंगपुरी यांनी घेतली आहे. पुरी यांनी ट्विट करुन देसाई यांच्या सहकर्याच्या कामाचे कौतुक केले.डेगवेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा दिलीप देसाई यांच्या रूपाने खोवला आहे. दिलीप एअर इंडियाच्या सुरक्षा विभागात सुपरीटेंड पदावर कार्यरत आहे. सध्या कोरोनामुळे संपूर्ण जगाचं जीवन विस्कळीत झालेली आहे. बरेचसे भारतीय प्रवासी परदेशात अडकले त्यांना भारत सरकारने एयर इंडियाच्या मदतीने भारतात सुरक्षित परत आणले. भारतात जेव्हा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा लॉकडाऊन जाहीर झाले आणि आपण पाहतच असाल की रेल्वे, विमान, बस सगळ सगळ अगदी बंद. घराच्या बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले. पण जगभरात आणि भारतातसुद्धा कोरोना लागण झालेल्या रोग्यांची संख्या वाढू लागली. डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी तसेच इतरही कर्मचारी कामाला लागले. प्रत्येकजण आपल्या जबाबदारीने अहोरात्र काम करीत आहेत. पण आता लागणारी औषध सामग्री कुठुन आणायची प्रश्न मोठा बिकट होता अशावेळी एअर इंडिया परत मदतीसाठी धाऊन आली.
देशांतर्गत तसेच परदेशात बरीच विमाने कोरोना विरूद्ध लढणारी साधन सामुग्री, तसेच औषध घेऊन रवाना झाली.
आता देशांतर्गत अशीच सुविधा पुरविण्याची जबाबदारी एअर इंडियावर आली. त्यात PPF Kit, Safety kits, Disposable kits, Hydroxychloroquine medicine अशी कितीतरी सामुग्री भारताच्या कोनाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य असतानाही एअर इंडिया ही जबाबदारी निभावत आहे कारण दिलीप देसाई सारखे कर्मचारी आहेत म्हणुन ते आपले काम नसतानाही अहोरात्र सगळी औषधे वगैरे जातीने लक्ष घालून जबाबदारीने विमानात पोहोचवली. त्याची ही कामाची नोंद दिल्ली दरबारी नागरी विमान मंत्रालयापर्यंत पोहोचली. दिल्ली मध्ये इतका आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला की दिल्लीवाले कर्मचारी म्हणायचे
“मुंबई मे दिलीप देसाई है ना तो कोई डर नही सब काम ठिकठाकसे होगा”
शेवटी माननीय श्री.हरदीप सिंग पुरी भारत सरकारच्या नागरी विमान मंत्री महोदयानी दिलीपच्या कामाची दखल घेऊन ट्विटरवर त्या अभिनंदन आणि कौतुक केले.
भारत सरकारच्या केंद्रीय मंत्र्यानी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याचे कौतुक करावे आणि तो डेगवे ग्रामस्थ असावा ही निश्चितच समस्त डेगवेवासीयांसाठी कौतुकास्पद बाब आहे. मंत्रि यांचा ट्विटर संदेश असा आहे.
Shri.Hardeep Singh Puri
Minister of Civil Aviation
Delhi
” Dilip Desai Security Supdt & member of team @Alliance Air
has been helping with travelling of
Essential and Medical cargo under
Lifeline UDAN on a daily basis be it night or day. He is always ready to help. Hats off to his service.
COVID Warrior”
दिलीप देसाई यानी सांगितले की बिकट परीस्थीतीत काम करण्याची संधी मिळाली मी आणि माझे सहकारी आणि कंपनी कागो सेवेद्वारे अत्यावश्यक सेवा पोहचविण्याचे काम करीत आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत आहोत आमच्या कामाची दखल केंद्रीय मंत्र्यानी घेतली त्यामुळे आमचा हुरुप वाढला आहे.









