प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 14 व 15 ऑक्टोबर रोजी गोवा दौऱयावर येणार असून ते दक्षिण गोव्यातील एका कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. शिवाय भाजपचे आमदार, मंत्री, पदाधिकारी यांच्या बैठकाही ते घेणार असून आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहा यांची गोवा भेट भाजपसाठी महत्त्वाची असून पक्षातर्फे त्यांचे स्वागत व इतर बैठकांचे कार्यक्रम निश्चित करण्यासाठी तयारी केली जात असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.









