नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज एम्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारकडे मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर आहेत. पण एकाही राज्याने केंद्राकडे व्हेंटिलेटरची मागणी केली नसल्याचे दावा केला. यासोबतच प्रत्येक देशवासियांनी . टेस्टिंग, ट्रेकिंग आणि ट्रिटींगला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन माध्यमांसी संवाद साधताना म्हणाले की, लोक अजूनही कोरोना संसर्गामुळे गंभीर नाहीत. निष्काळजीपणे वागत आहेत. केंद्र सरकारकडे व्हेंटिलेटर आहेत. मात्र, कोणत्याही राज्य सरकारने आमच्याकडे व्हेंटिलेटरची मागणी केलेली नाही. बहुतेक राज्य सरकारांना आम्ही व्हेंटिलेटर दिले आहेत. त्यांनीही अजूनपर्यंत त्याचा वापर केलेला नाही. त्यांच्याकडे व्हेंटिलेटर लावण्यासाठी जागाच नाही, असं सांगतानाच कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. आता पुष्कळ अनुभव आला आहे. सामानही पुरेसं आहे आणि टेस्टिंगची सुविधाही पुरेशी असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, कोरोना रूग्ण संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळेच रुग्णालये भरून जात असून बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे आम्ही सिस्टिममध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला संयम आणि साहसाने काम केलं पाहिजे, असं सांगतानाच डॉक्टर परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी त्यांनी थ्री-टीवर भर देण्याचं आवाहन सर्व राज्यांना केलं. टेस्टिंग, ट्रेकिंग आणि ट्रिटींग या तीन गोष्टी विसरू नका. प्रत्येक देशवासियांनी या थ्री-टीला गांभीर्याने घ्यावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









