ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या आईचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
हर्ष वर्धन यांच्यावर मागील काही दिवसांपासून हृदयरोगाशी संबंधित उपचार सुरू होते. डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटमध्ये त्यांचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘आज सकाळी ह्रदयरोगाचा झटका आल्याने माझी आई स्वर्गवासी झाली. माझ्यासाठी विशाल व्यक्तीमत्व, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेली आई गेल्याने मी पोरका झालो आहे, तिची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही,’ असे भावूक ट्विट हर्ष वर्धन यांनी केले आहे.









