ऑनलाईन टीम
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नडमध्ये अंकोला येथे त्यांची कार उलटली. अपघातात नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचे निधन झाले. तर श्रीपाद नाईक गंभीर जखमी आहेत. अपघात झालेल्या गाडीतून सहाजण प्रवास करत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, नाईक यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना विजया नाईक यांचे निधन झाले.
श्रीपाद नाईक यांना गोव्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
पाहा व्हिडिओ >
https://www.facebook.com/tarunbharat.goa/videos/193496209131177