ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची माहिती आणि प्रक्षोभक मेसेज देणारी 1178 पाकिस्तानी-खलिस्तानी ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिला आहे. मात्र, ट्विटरने अद्याप केंद्राच्या आदेशाचे पालन केलेले नाही.
सरकारने काही दिवसांपूर्वीच ट्विटरला अशा प्रकारची 250 अकाऊंट ब्लॉक करण्यास सांगितले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरल्याने ‘किसान हत्याकांड’ सारख्या हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडूून गुरुवारी ट्विटरला 1178 पाकिस्तानी-खलिस्तानी ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याची ताजी नोटीस देण्यात आली होती.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई न केल्याबद्दल ट्विटर आता आयटी मंत्रालयाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येते.









