प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कितीप्रमाणात कपात करावी ! याबाबत केंद्रीय मनुष्यबळ संसाधन मंत्रालयाकडून मार्गदर्शकतत्त्वे आल्यानंतरच निश्चित केली जाणार आहेत.
मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शालान्त व उच्च माध्यमिक मंडळाच्या तज्ञ समिती बोर्ड ऑफ स्टडिजची महत्त्वाची बैठक राज्यातील मुख्याध्यापक व संबंधितांकडे दीर्घकाळ चालली. आगामी 10 वी व 12 वी परीक्षा कधी घ्यावी! कशी घ्यावी? या विषयावर सखोल चर्चा झाली. मात्र कोणत्याही एका निर्णयाप्रत ही समिती आली नाही. कारण केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय नेमका कोणता निर्णय घेणार आहे! याबाबत माहिती हाती आलेली नाही. त्यांनी जारी पेलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. कारण आता काही विषयातील काही धडे रद्द केले व नंतर कळाले 190 दिवसांचा शिक्षणक्रम असेल तर संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य आहे. जुलैच्या अखेरीस राज्यातील शाळांमध्ये पहिली चाचणी परीक्षा होत असते. यावर्षी अद्याप शैक्षणिक वर्षच सुरू झालेले नाही. सरकारने कळविल्यानंतर राज्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली. तथापि अद्याप 15 टक्के विद्यार्थेवर्ग या ऑनलाईन शिक्षणाला प्रतिसाद देत नाही. एकतर त्या त्या भागात रेंज नाही. इंटरनेट सुविधा नसावी किंवा ऑनलाईन शिक्षणाला ते प्रतिसाद तरी देत नसावेत.
यामुळे ऑनलाईन शिक्षणावर आणखी काही पर्याय निघतोय का? हे पाहिले जात आहे. शाळा कधी सुरू करायच्या हे ठरत नाही. 15 ऑगस्ट नंतरच त्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकार या महिन्याअखेर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहेत. त्याच्या प्रतिक्षेत गोवा शालान्त मंडळ आहे. पेंद्र सरकार नेमके काय ठरवितेय यावर राज्यातील शाळांचे भवितव्य अवलंबून आहे असे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.









