प्रतिनिधी / वडूज :
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांचे विविध आर्थिक, प्रशासकीय, सेवा विषयक, पदोन्नती, वेतनश्रेणी, वेतनवाढ, फिरती भत्ता, रिक्त पदे भरती, शैक्षणिक इत्यादी अनेक पायाभूत व मुलभूत प्रश्नांची सोडवणूक सन 1996 पासुन झालेली नाही. त्यामुळे मार्चमध्ये राज्यव्यापी आंदोलन आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड, केंद्रप्रमुख भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष अरुण मडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख भारती संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख व सातारा जिल्हाध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी दिली.









