मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्राला जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणार्या लोकांची संख्या २० लाख असून पहिला डोस घेणार्या लोकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोसची लस मिळेल परंतु पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये लसीचा साठा आहे. तो संपत नाहीये. खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला त्या लसीची मुदत संपेल ही भीती वाटते आहे म्हणून त्यांनी तो साठा सरकारला तात्काळ द्यावा जेणेकरून निर्माण झालेली लसटंचाई कमी होईल. जेव्हा त्यांना आवश्यक आहे त्यावेळी टप्प्याटप्याने ती लस परत करण्यात येईल,” असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही झाल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितलं.
दरम्यान केंद्र सरकारने राज्यात निर्माण झालेली लस टंचाई लक्षात घेता तात्काळ लसीचा पुरवठा करावा अशी मागणीही करण्यात आल्याचे देखील नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








