प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘फोन पे ऍप्लीकेशनमध्ये 5 हजार रुपयांचे कॅशबॅक रिवार्ड लागले आहे’, असे आमिष दाखवून महिलेला दीड लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडल़ी नंदीनी लहू निंबरे (22, ऱा वेतोशी खालचीवाडी) असे त्यांचे नाव आह़े याप्रकरणी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केल़ी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदीनी यांना 11 सप्टेंबर 2021 रोजी नितीन कुमार नावाच्या इसमाने मोबाईलवर कॉल केला होत़ा यावेळी ‘तुम्हाला फोन पे या ऍप्लीकेशनवर 5 हजार रुपयांचे पॅशबॅक रिवार्ड लागले आहे’ अशी बतावणी केल़ी यासाठी बँक खात्याचा तपशीलासह कार्डनंबर व पासवर्ड मागितल़ा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निंबरे यांनी सर्व माहिती दिली.
माहिती देताच त्यांच्या खात्यामधील सुमारे दीड लाख रुपये ट्रान्स्फर झाल़े याप्रकरणी संबंधित नितीन कुमार नावाच्या इसमाविरुद्ध ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मारुती जगताप करत आहेत़









