अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता यापूर्वीच जाणवू लागली होती. परंतु आता तेथे गंभीर रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याचमुळे लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॅलिफोर्निया प्रांत कोविड-19च्या वाढत्या संक्रमणाला तोंड देत आहे. हा अत्यंत अवघड काळ आहे. आमच्या रक्तपेढींना दात्यांची अत्यंत गरज आहे. कृपया प्रत्येक रक्तगटाच्या लोकांनी पुढाकार घ्यावा. या महामारीला सामोरे जाण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. आमच्या लोकांचा जीव वाचवावा लागणार असल्याचे प्रांताच्या आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. कॅलिफोर्नियात दिवसभरात 585 बाधितांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसातील बळींचा हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. स्थिती अत्यंत बिघडल्याने आरोग्य कर्मचाऱयांसह नॅशनल गार्ड, अमेरिकन सैन्याचे आरोग्य पथकही तैनात करण्यात आले आहे. रुग्णांना अन्यत्र हलविण्यासाठी वायुदलाची मदत घेतली जात आहे.
Previous Articleमहावितरणमध्ये २५ हजारांवर पदे रिक्त
Next Article ब्रिटनच्या संकरावताराला ‘अलग’ करण्यास यश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









