ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कॅलिफोर्नियातील जंगलात लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले आहे. या आगीत 2 दशलक्ष हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. ही आग विझवण्यासाठी 14 हजार अग्निशमन दलाचे जवान झगडत आहेत.
मागील तीन दिवसात कॅलिफोर्नियातील तापमान वाढले आहे. उष्णतेच्या लाटा आणि कोरडे वारे यामुळे आग भडकत आहे. वीज तारांच्या स्पार्किंगमुळे इतर ठिकाणी आग लागू नये, यासाठी 21 परगण्यांतील 1 लाख 58 घरांचा वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी सुरू आहे. तसेच संभाव्य विध्वंसाची भीती लक्षात घेऊन अमेरिकी वन सेवा विभागाने दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्व आठ राष्ट्रीय वने बंद केली आहेत.
उन्हाळ्यात होणारी पानगळती, वाळलेले गवत आणि सध्याचे प्रचंड तापमान यामुळे आणखी नव्या ठिकाणी आग लागण्याचा धोका आहे. कॅलिफोनिर्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आगीसाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे सर्व राष्ट्रीय वनांतील कॅम्पग्राउंड्स बंद करण्यात आले आहेत.









