ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात फायझरची लस टोचून घेतलेल्या एका नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. मॅथ्यू डब्ल्यू असे या नर्सचे नाव असून, ती दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
कोरोना संक्रमित नर्सने 18 डिसेंबरला फायझरची कोरोना लस टोचून घेतली होती. लस घेतल्यानंतर त्यांना कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवले नव्हते. 25 डिसेंबरला नर्सची तब्बेत बिघडली. तिची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.
दरम्यान, फायझरने आपली कोरोना प्रतिबंधक लस 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला होता. मात्र, या प्रकारामुळे आता लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









