वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स खुल्या महिलांच्या तसेच पुरूषांच्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत टॉप सीडेड कॅरोलिना प्लिस्कोव्हाने तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. पण, स्पेनच्या मुगुरूझाचे आव्हान संपुष्टात आले.
महिला टेनिसपटूंच्या मानांकनात तिसऱया स्थानावरील प्लिस्कोव्हाने दुसऱया फेरीतील सामन्यात पोलंडच्या 23 वर्षीय मॅग्डेलिना प्रेचचा 7-5, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये 80 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत तिसरी फेरी गाठली. या सामन्यात प्लिस्कोव्हाने सहा बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.
दुसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टॉमलेजेनोव्हिकने स्पेनच्या मुगुरूझाचा 6-3, 1-6, 6-3 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. दुसऱया एका सामन्यात जेबॉरने सेव्हास्टोव्हाचा 6-2, 6-7 (5-7), 6-3 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.









