प्रत्येक चौकातील हायमास्ट बंद तर दिवे असूनही रस्त्यावर अंधार : त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदीप आणि हायमास्ट गेल्या कित्येक महिन्यापासून बंद आहेत. पथदीप सुरू करण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले आहे. संचयनी सर्कल येथील हायमास्टसह रहदारी पोलीस स्टेशनपर्यंतचे पथदीप बंद झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी पादचाऱयांवर भटकी कुत्री हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत.
कॅन्टोन्मेंटकडून विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्येक रस्त्यावर पथदीप आणि चौकामध्ये हायमास्ट बसविण्यात आले आहेत. पण गोगटे चौक, संचयनी सर्कल, अरगन तलाव चौक, शौर्य चौक अशा विविध ठिकाणी असलेले हायमास्ट गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. हायमास्ट दुरूस्त करण्यात यावेत, अशी तक्रार कॅन्टोन्मेंट बोर्डकडे करण्यात आली असता याची दखल घेण्यात येत नाही. तसेच विविध ठिकाणाचे पथदीप देखील बंद असून, विशेषत: नागरिकांची रहदारी असलेल्या रस्त्यावरील पथदीप देखील बंद ठेवण्यात आले आहेत. खानापूर रोड रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. तेव्हापासून संचयनी चौक ते गोगटे चौकपर्यंतचे पथदीप बंदच ठेवण्यात आले आहेत. तसेच क्लब रोड, पोस्ट मेन रोड आणि संचयनी चौक ते रहदारी पोलीस स्थानकासमोरील पथदीप बंद आहेत. संचयनी चौक ते रहदारी पोलीस स्थानकाकडे जाणाऱया रस्त्यावर वाहनांसह पादचाऱयांची वर्दळ असते. पण हा रस्ता पूर्णपणे अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. कॅम्प परिसरातील नागरिक पायी चालत बाजारपेठेत येत असतात. पण रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार पसरल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याशेजारी भटक्मया कुत्र्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने अंधारात पादचाऱयांवर हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. महिला पोलीस स्थानकासमोरील झाड कोसळल्यामुळे येथील पथदीप बंद ठेवले होते. तेव्हापासून हे पथदीप अद्यापही बंदच आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्याशेजारील प्रत्येक खांबावर पथदीप आहेत. पण कधीच सुरू नसतात. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील पथदीप केवळ शोभेचे बनले आहेत. पथदीपांची दुरूस्ती करून सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.









