प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक गुरुवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणतीच माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची प्रत्येक बैठक नागरिकांसाठी खुली ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे. पण बैठक सभागृहात नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सभागृहात चालणाऱया बैठकीचे थेट प्रक्षेपण कक्षाच्या बाहेर स्क्रिनद्वारे करण्यात येते. त्यामुळे बैठकीची माहिती नागरिकांना मिळते. पण अलीकडे बैठक असल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. एरव्ही बैठकीची माहिती आणि बैठकीची विषयपत्रिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासह माध्यम प्रतिनिधींना देण्यात येत हेती. पण सध्या बैठकीची माहिती प्रसिद्ध करण्यात येत नसल्याने बैठकीची माहिती मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे बैठक असल्याबाबतची माहिती नागरिकांना मिळत नाही.
बैठकीची माहिती लपविण्याचे गौडबंगाल काय?
गुरुवार दि. 28 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. पण याबाबत कोणतीच माहिती संकेतस्थळावर नसल्याने बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. बैठकीची माहिती लपविण्याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.









