प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड कामगार संघटनेच्या कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कामगार संघटना सल्लागार समितीचे सदस्य हनुमंत निकम यांचा सत्कार के. आनंद यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कामासाठी सहकार्य केलेल्या सदस्यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या हस्ते करण्यात आला.









