10 कोटी डॉलर्स गुंतवणार – स्टार्टअप कंपन्यांना बळ
वृत्तसंस्था/ मुंबई
कॅक्टस वेंचर पार्टनर्स कंपनी पुढील 3 वर्षाच्या कालावधीत भारतात स्टार्टअप कंपन्यांसाठी 10 कोटी डॉलरची रक्कम गुंतवणूक करण्याची योजना बनवत असल्याचे समजते. यायोगे स्टार्टअप कंपन्यांना अधिक बळ प्राप्त होणार आहे.

कंपनी स्टार्टअप कंपन्यांकरीता गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे. प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचणाऱया ब्रँडस आणि तंत्रज्ञान स्टार्टअप कंपन्यांना गुंतवणूकीत प्राधान्य देणार असल्याचे कंपनीचे संस्थापक अनुराग गोयल यांनी सांगितले. आमची गुंतवणूक ही भारतातील स्टार्टअप कंपन्यांकरीता असेल. आपल्या नेटवर्कचा फायदा घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्याची संधी गुंतवणूकप्राप्त स्टार्टअप कंपन्यांना मिळेल.
या क्षेत्रातील कंपन्या
गुंतवणूकीसाठी विविध क्षेत्रातील कंपन्यांची निवड कॅक्टसने केली आहे. नव्या गुंतवणूक कंपन्यांमध्ये आयुर्वेदीक क्षेत्रातील ऑरीक, लाइफस्टाइल क्षेत्रातील एएमपीएम आणि आरोग्य व विमा क्षेत्रातील विट्राया टेक्नॉलॉजीस यांचा समावेश असणार असल्याची माहिती कॅक्टस वेंचर्सने दिली आहे.









