प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी/सांगली
कोयनेतून आज शुक्रवारी दुपारपर्यंत 50000 क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण सुरू करावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
सांगलीमध्ये आयर्विन पूल येथे पाणीपातळी 50 ते 52 फुटापर्यंत वर जाऊ शकते याची नोंद घेऊन सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








