बोरगाव / वार्ताहर
वाळवा तालुक्यातील बोरगाव हे कोरोना महामारीच्या संकटापासून गेली चार महिने दूर राहिले होते मात्र कोरोना बाधित पेशंट सापडल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आजपासून ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत बोरगाव तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवेत असणाऱ्या आशा स्वयंसेविका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तीन दिवसापूर्वी स्वब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल ३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्यामुळे आज दिवसभर गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने बाधित व्यक्ती राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन केलेला आहे या बाधित व्यक्तीसह कुटुंबातील ६ लोकांना इस्लामपूर कोव्हीड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
या परिसरात राहत असलेल्या ४५ कुटुंबाची आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणीचे काम सुरू असून उर्वरित तीन दिवसात गावातील संपूर्ण लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. या काळात दवाखाना, मेडिकल, दुध या अत्यावश्यक सेवा सुरू असून इतर सर्व व्यवहार बंद राहतील तसेच कंटेन्मेंट झोन परिसरातील नागरिकांनी दक्षता घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची विनंती सरपंच जयंती पाटील, उपसरपंच सूर्यकांत पाटील, माजी उपसरपंच प्रमोद शिंदे, पोलीस पाटील पद्मश्री गिरीगोसावी, ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ, तलाठी प्रकाश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष रणधीर पाटील व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या वतीने करण्यात आली.
Previous Articleसोलापूर जिल्ह्यात 984 कोटींचे पीककर्ज वाटप : जिल्हाधिकारी
Next Article अयोध्येतील राम मंदीराचा प्रस्तावित आराखडा सादर








