प्रतिनिधी / कुरुंदवाड
गेल्या दोन दिवसापासून जोरदार पडत असलेल्या पावसाने आज शुक्रवारी थोडी विश्रांती घेतली असली तरी तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत आज पुन्हा 2 फुटाने वाढ झाली आहे.
तालुक्यात कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने पंचगंगा नदीवरील तेरवाड व शिरोळ तसेच कृष्णा नदीवरील राजापूर बंधारे पाण्याखाली गेले असून शिरोळ बंधारा पाण्याखाली गेल्याने जुना कुरुंदवाड शिरोळ मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामुळे तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या शेती पंपाच्या मोठा री काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे तर नदी काठालगत असणारे गवताची कुरणे पाण्याखाली गेल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान आज शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडीप असल्याने पाणीपातळी संथगतीने दोन फुटाने वाढली आहे.
दरम्यान पंचगंगा नदीवरील शिरोळ तालुक्यातील शेवटच्या तेरवाड बंधारा येथून पुढे कृष्णा नदीत 21 हजार 145 क्यूसेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून तेरवाड बंधारा येथे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ची उंची शुक्रवारी सायंकाळी 41फूट इतके नोंदवली गेली तर कृष्णापंचगंगासंगम कुरुंदवाड घाट येथून पुढे 48 हजार 752 क्यूसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग पुढे सुरू असून येथे पाण्याची पातळी आज सायंकाळी 29 फूट 7 इंच इतकी नोंदवली गेली तसेच कृष्णा अंकली पूल येथून पुढे 21 हजार 452 क्यू एक्स निसर्ग होत आहे कृष्णा नदीवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटच्या कोल्हापूर पद्धतीच्या राजापूर बंधारा येथून पुढे 53 हजार 600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या संकटाच्या पाठोपाठ पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा एकदा महापुराचे सावट तालुक्यावर दिसू लागल्याने पूरग्रस्त नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Previous Articleमालकापुरात पाच दिवस जनता कर्फ्यू
Next Article व्होडाफोन-आयडियाचीस्थिती नाजूक









