प्रतिनिधी/ पणजी
केंद्र सरकाने संमत केलेले कृषीविधेयक केवळ शेतकऱयांचाच घात करणारे नव्हे तर समस्त जनतेला देशोधडीला लावणारे आहे. बेकायदेशीरपणे संमत केलेले कृषी विधेयक त्वरीत रद्द करा अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रपतीपर्यंत पोचविण्यासाठी राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजभवनपर्यंत रॅली काढून राज्यपालांकडे सादर केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य व गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधीपक्षनेते व मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार लईझीन फालेरो, सरचिटणीस व माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा, जनार्धन भंडारी, विजेय भिके, सकंल्प आमोणकर, जोसेफ डायस, अभिजीत देसाई तसेच सुमारे 200 कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकार विरोधात ाजेरदार घोषणाबाजी करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजभवनवर मोर्चा नेला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन सादर केले.
कृषी विधेयक त्वरीत रद्द करावे अशी मागणी करताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की केंद्र सरकाने बेकायदेशीर रित्या कृषी विधेयक समंत केले आहे, संमत केलेले विधेयक शेतकऱयांना त्रासदाक ठरणारे असून केवळ कॉरपरेट वाल्याने मोठा फायदा करून देणारे आहे असेही चोडणकर यांनी सांगितले. राजभवनावर ते पत्रकारांशी बोलत होते. या विधेयकामुळे शेतकरी केवळ कंत्राटी कामगार होणर असून कालांतराने शेतकरी जमीनी विकून टाकणार. वास्तवीक शेतीविषयक निर्णय घेण्याचे हक्क त्यात्या राज्याना देणे आवश्य आहे. केंद्रसरकारने संमत केलेल्या विधेयकातून राज्यांच्या हक्कावर गदा आणली आहे. असेही चोडणकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना चोडणकर म्हणाले की शेतकरी आपले पीक कुठेही विकू शकतो हे आजही शक्य आहे आणि कालही शक्य होते. शेतकरी जी पीक पिकवतात ती सगळीच पीक शेतकऱयांना कित्येक किलोमिटर जाऊन विकणे शक्य आहे काय म्हणूनच मंडी असणे फार महत्वाचे आहे. कित्येक लोकंच्या पोटावर पाय ठेऊन केंद्र सरकारने कृषी विधेयक संमत केली आहेत. सरकाने केवळ लोकांची दिशाभूल करीत आहेत. या विधेयकांमुळे केवळ शेतकरीच नव्हे तर समस्थ जनता त्रासात पडणार आहे. असेही चोडणकर म्हणाले.
राज्यातील मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांनी केवळ पंतप्रधानाचा बावला बनून काम करू नये तर गोमंतकीयांच्या हितासाठी काम करावे असा टोमणा चोडणकर यांनी मारला. मुख्यमंत्र्यांनी गोवा रसातळात पोचविण्याच चंग बानला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तालावर मान डोलवून त्यांनी गोव्याची म्हादई विकली, गोमंतकीयांवर कोळसा लादला इतकेच नव्हे तर आयआयटीच्या नावाखाली आता गोव्याच्या पर्यावरणाचा खात्म करायला पाहत आहे. काँग्रेस पक्षाचा आयआयटी प्रकल्पाला विरोध कधीच नाही आणि नव्हताही. पण पर्यावरणाचा नाश करून आयआयटी उभारण्या पेक्षा ओसाड पडलेल्या जमीनीवर आयआयटी प्रकल्प का उभारत नाही असा प्रश्न चोडणकर यांनी उपस्थित केला.
यावेळी आग्नेल फार्नांडिस दिगंबर कामच यांनीही समयोजीत विचार प्रगट केले. केंद्र सरकाने संमत केलेले कृषी विधेयक रद्द करा अशी मागणी सर्वांनी एकमुखाने केली.









