सांगली/प्रतिनिधी
केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिलेबी आणि पेढे वाटून जल्लोष केला. दरम्यान तीन कायदे रद्द करणे याचाच अर्थ मोदी सरकारला शेतकरी एक जुटीपुढे झुकावे लागले अशी प्रतिक्रिया स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केली.
तीन कृषी विधेयके रद्द करा या मागणीसाठी गेली वर्षभर दिल्ली या ठिकाणी हजारो शेतकरी आंदोलन करत होते. मात्र सदर शेतकरी अतिरेकी आहेत दहशतवादी आहेत अशा वावड्या उठवून आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू होते. आंदोलन मोडून काढण्यासाठी आंदोलकांना चिरडण्यात आले पण तरीही शेतकरी मागे हटले नाहीत त्यामुळेच कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींना करावी लागली याबाबत महेश खराडे म्हणाले दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत किसान मोर्चाच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. विधेयक होळी केली. स्टेशन चौकात एक महिना धरणे आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको बंदही पाळण्यात आला होता. हा ऐतिहासिक विजय आहे यावेळी संदीप शिरोटे सर्जेराव पवार, प्रकाश मिरजकर रामराव मोडे सुमित चव्हाण विजय पाटील अशलेश गाडवे,आदीसह शेतकरी उपस्थित होते