ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे कायदे मागे घेण्याचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने हे विधेयक आता संसदेत मांडले जाणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या शिफारशीनंतर कृषी मंत्रालयानं कृषी कायदे रद्द करण्याचं विधेयक तयार केले असून, ते 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. आज दुपारी 3.00 वाजता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत.