ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
नवे विधेयक मंजुर करत देशात कृषी कायदे लागु केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा [ SKM ] ने भारत बंद पुकारला होता. याला देशातील शेतकऱ्यांनी पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे या सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत आपला कृषी कायद्यांविरोधातील रोष व्यक्त केला आहे.
या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध महामार्गावरील रस्ते तसेच रेल्वे मार्ग अडवून धरले आहेत. विरोध लक्षात घेऊन दिल्ली वाहतूक पोलिसांनी गाझीपूर सीमेवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे, तर शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा दरम्यान सीमा बंद केली आहे.
देशातील बहूतांशी राज्यातुन या आंदोसनास सक्रिय सहभाग नोंदवल्याने केंद्र सरकार हे आंदोलनास कोणत्या प्रकारे प्रतिसाद देते. अथवा दखल घेणारच नाही. हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. या आंदोलनास मुख्यत: पंजाब. राज्यस्थान, देशाची राजधानी नवी दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगंणा, बिहार या राज्यात हे आंदोलन अधिक सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.