दिल्ली/प्रतिनिधी
संसदेचे हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळात लोकसभेत कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मांडल्यानंतर लोकसभेने शेती कायदे रद्द करण्याचे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर केले. लोकसभेने कोणतीही चर्चा न करता शेत कायदे निरसन विधेयक, २०२१ मंजूर केले. यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली होती.









